मुंबई दि.4 मे – मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर आज 4 मे रोजी राज्यात अनेक ठिकाणी काही घडामोडी घडल्या. दरम्यान, अल्टीमेटमचा कालावधी काल संपला असून त्याआधीच पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत मनसेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड केली.
राज ठाकरेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम (Ultimate) काल दि.3 मे रोजी संपला. यानंतर राज्यभरात मशिदींबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा (Police force) तैनात करण्यात आला आहे. यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज ठाकरे यांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी पहाटे अजानच्या वेळी हनुमान चालिसा लाऊडस्पीकरवर (Loudspeaker) वाजवल्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते सज्ज असल्याचे पहायला मिळाले. तर राज ठाकरे यांच्या अल्टीमेटममुळे अनेक ठिकाणी आज पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर झाली नसल्याचे आढळून आले.
राज्यभरातील पडसाद…
जळगाव – आज मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांकडून शनिमंदिरात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्यात आले
नाशिक – मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांची धरपकड, पोलिसांनी 7 ते 8 महिलांना ताब्यात घेतले.
औरंगाबाद – मनसेच्या 100 हुन अधिक कार्यकर्त्याना 149 कलमाच्या पोलिसांनी बजावल्या नोटिसा. दरम्यान, मनसेचे प्रमुख कार्यकर्ते अंडरग्राऊंड.
मुंबादेवी परिसरात स्पीकरवर हनुमान चालीसा लावणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली.
नाशिक – सकाळपासून शहरातून 29 मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यापैकी काही जणांना तडीपारीच्या नोटीसा देण्याची कार्यवाही सुरू.
वाशिम – मनसैनिकांकडून भोंग्यावरून हनुमान चालीसा पठण करण्यात आले.
नवी मुंबई – नेरूळमध्ये मशिदीच्या परिसरात मनसैनिकांकडून स्पीकर लावून हनुमान चालीसा पठण करण्यात आले.
औरंगाबाद – पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते अंडरग्राऊंड. जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, राजीव जावळीकर अज्ञातवासात. मात्र जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी औरंगाबादमध्ये झालेल्या बदलाबद्दल माध्यमासमोर आभार मानले.
नाशिक – अनेक मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड, बहुतेक मशिदींची अजान आज भोंग्यांवरून नाही
भिवंडी – भोंगा आंदोलन करण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते ताब्यात, मस्जिद मधून ही भोंग्यावर अजान नाही. शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्यासह तीन कार्यकर्त्यांसह पहाटे 4.45 वाजता शांतीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वांद्रे – परिसरातील बडी मशिदीवर पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर झाली नाही , मशीदी बाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
( Today’s developments in the state after Raj Thackeray’s ultimatum; See where Hanuman Chalisa is. )