किल्लेधारूर दि.२९(वार्ताहर)- गेली चार दिवस कमी असलेली संख्या आज वाढली आहे. येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज केवळ ६ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. यातील २ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर येथून काल पाठवण्यात आलेल्या २७ स्वॅब अहवाला पैकी ३ पॉझिटीव्ह आली आहेत. तर तालुक्यातील १ रुग्ण माजलगाव येथे पॉझिटीव्ह (positive) आढळल्यामुळे आज ६ संख्या झाली आहे. कालच्या स्वॅब मधील दोघांचा अहवाल अनिर्णित आहे.
गेली चार ते पाच दिवसात ॲन्टीजन तपासण्या व स्वॅब (Swab) नमुने अत्यंत कमी प्रमाणात होत असल्यामुळे पॉझिटीव्ह (positive) रुग्णांची संख्याही कमी होती. आज ६ ॲन्टीजन चाचण्यात २ रुग्ण पॉझिटीव्ह आढळली आहेत तर कालची २७ स्वॅब (Swab) नमुन्यातील ३ पॉझिटीव्ह आली आहेत. १ रुग्ण माजलगाव येथे पॉझिटीव्ह (positive) आढळल्यामुळे आजची संख्या चार दिवास सर्वाधिक ६ झाली आहे. आज ६ जनांचे स्वॅब नमुने अंबाजोगाईला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
ॲन्टीजन (Antigen)
१. ३२ वर्षीय स्त्री, पहाडी पारगाव, ता.धारुर
२. ५५ वर्षीय स्त्री, बाराभाई गल्ली, धारुर
३. ६३ वर्षीय पुरुष, कोयाळ, ता.धारुर (माजलगाव)
स्वॅब (Swab)
४. ४३ वर्षीय पुरुष, क्रांती चौक, धारुर
५. ४२ वर्षीय पुरुष, उंदरी, ता.धारुर
६. १३ वर्षीय स्त्री, उंदरी, ता.धारुर
यांचा समावेश आहे.