बीड दि.2 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2062 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 27 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 2035 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असताना कोरोना मृत्यूची संख्येत मात्र वाढ होत आहे.
(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-7, अंबाजोगाई-5, आष्टी-9, धारुर-0, गेवराई-0, केज-3, माजलगाव-0, परळी-1, पाटोदा-1, शिरुर-1, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख उतरला असून जनजीवन पुर्वपदावर आले आहे. आज चार तालुके निरंक आहेत. मात्र उर्वरित तालुक्यात बाधित आढळून येण्याचा प्रकार सुरुच आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाणही अधिक असून चालू आठवड्यात मृत्यूची संख्या 14 आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात दिवसभरात 3105 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 50 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात 3164 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 74 हजार 892 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.27 टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 89 लाख 10 हजार 564 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 53 हजार 961 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 41 हजार 110 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1355 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.