BEED24

आजची पॉझिटीव्ह संख्या …. पहा किती व कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.३(वार्ताहर) धारुर तालुक्यातील आजच्या तपासणीत कोरोना (Corona) बाधितांची संख्या १० आहे. काल पाठवलेली ३ स्वॅब (swab) चा अहवाल निगेटिव्ह आली आहेत. तर ६३ ॲन्टीजन तपासणीत १० जन पॉझिटीव्ह आढळली आहेत. यात शहरातील ४, रुईधारुर येथील ४ व मुंगी व पिंपरवाड्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

काल येथील आरोग्य यंत्रणेकडून तालुक्याची आढावा बैठक घेवून सुचना करताच संशयित रुग्णांची तपासणी वाढली आहे. आज पुन्हा १० पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. यात धारुर शहरातील ४ तालुक्यातील रुईधारुर येथील ४ तर तालुक्यातील पिंपरवाडा व मुंगी या गावातील दोघांचा समावेश आहे. ६३ ॲन्टीजन (Anigen) तपासणीत १० जन कोविड (Covid-19) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. तर काल पाठवलेल्या ३ स्वॅब (swab) नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

ॲन्टीजन (Anigen) चाचणीतील कोरोना (Corona) पॉझिटीव्ह

१. २८ वर्षीय पुरुष, पिंपरवाडा, ता.धारुर

२. ३५ वर्षीय पुरुष, क्रांति चौक, धारुर

३. ५० वर्षीय पुरुष, मुंगी, ता.धारुर

४. ४८ वर्षीय पुरुष, उदयनगर, धारुर

५. ६२ वर्षीय पुरुष, जाधव गल्ली, धारुर

६. ७६ वर्षीय पुरुष, रुईधारुर, ता.धारुर

७. ७० वर्षीय स्त्री, रुईधारुर, ता.धारुर

८. २८ वर्षीय स्त्री, रुईधारुर, ता.धारुर

९. ५० वर्षीय स्त्री, रुईधारुर, ता.धारुर

१०. ३९ वर्षीय पुरुष, पाटील गल्ली,धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version