BEED24

बीड जिल्ह्याचे आजचे अपडेट; केज 210 तर धारुर 96, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.8 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4026 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1339 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2687 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s update of Beed district; Kaij 210 and Dharur 96, see taluka wise statistics.)

आज चौपन्नव्या दिवशी बीड तालुक्यात 327 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 242, आष्टी तालुक्यात 19 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 96 तर केजमध्ये 210 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-327, अंबाजोगाई-242, आष्टी-19, धारुर-96, गेवराई-54, केज-210, माजलगाव-60, परळी-136, पाटोदा-74, शिरुर-62, वडवणी-59 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसात दिड हजारापर्यंत वाढली आहे. यामुळे बीड जिल्ह्यात जाहिर केलेला कडक लॉकडाऊन पुन्हा चार दिवस वाढवून 12 मे पर्यंत कडक निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढले आहेत.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत तब्बल 4 लाख 1 हजार 78 नवीन कोरोना रुग्ण आढळले तर 4 हजार 187 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, आज नोंद झालेल्या आकडेवारीनुसार देशात संक्रमित होणाऱ्यांची एकूण संख्या 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 वर गेली आहे.

Exit mobile version