BEED24

स्कुल बस व दुचाकीच्या अपघातात दोघे ठार ; केज तालुक्यातील घटना.

केज दि.24 सप्टेंबर – स्कुल बस व दुचाकीच्या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना केज तालुक्यातील कोरेगाव पाटी येथे घडली. समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात तिघे गंभीर जखमी झाले होते. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर तिसऱ्या जखमीची प्रकृती चिंताजनक आहे.
( Two killed in school bus and two-wheeler accident; Incidents in Kaij Taluka. )

याबाबत अधिक माहिती अशी की, आज शनिवार (दि.24) रोजी दुपारी केज-बीड (Kaij Beed) रस्त्यावर कोरेगाव पाटी जवळ बन्सल क्लासेसची बस (school bus) क्रमांक एम.एच. 44- 9996 व दुचाकी क्रमांक एम.एच.14 बी जे 8574 या दोन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) भागवत कल्याण पवार, दिपक कल्याण पवार दोघे रा. कोरेगाव ( ता. केज ), सुनील मधुकर शिंदे रा. पिंपळगाव ( ता. केज ) हे तिघे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती कळताच विजयप्रकाश ठोंबरे, नंदकिशोर मुंदडा, गौतम बचुटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करत उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. येथे उपचारादरम्यान सुनील शिंदे यांचा मृत्यू झाला. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे दोघा पवार बंधुंना अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले होते. येथे दिपक पवार यांचा मृत्यू झाला. भागवत पवार यांच्यावर अंबाजोगाई (Ambajogai) येथे उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. अपघातातील दोघांच्या मृत्यू झाल्याची बातमी समजताच केज (Kaij) तालुक्यातील कोरेगाव व पिंपळगाव या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version