BEED24

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकात मराठवाड्यातील दोन नेते; बीडमधून हा नेता असणार स्टार प्रचारक.

बीड दि.2 फेब्रुवारी – गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) 24 स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये मराठवाड्यातून (Marathwada) बीडचे (Beed) पालकमंत्री धनंजय मुंडे व परभणीच्या (Parbhani) खा. फौजिया खान यांचा समावेश आहे.

(Two leaders from Marathwada in NCP’s star campaign; This leader from Beed will be a star preacher.)

गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress Party) आणि शिवसेनेने एकत्र लढण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता गोव्यात (Goa) राजकारण तापत चालले आहे. दरम्यान प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज झाली आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 24 स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली (Delhi) कार्यालयातून जाहीर केली.

या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचा समावेश आहे.

यासोबतच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik), सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, केरळचे वनमंत्री ए. के. ससिनद्रन, राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, खासदार फौजिया खान यांना या यादीत स्थान मिळाले आहे.

याशिवाय उर्वरित यादीत युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, विद्यार्थी आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, गोवा अध्यक्ष जोसे फिलीप डिसोजा, डॉ. प्रफुल हेडे, अविनाश भोसले, सतिश नारायणी (गोवा), केरळचे अध्यक्ष पी. सी. चोको, केरळचे आमदार थॉमस के. थॉमस, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांचा समावेश आहे.

 

Exit mobile version