BEED24

कालव्यात दोन शाळकरी विद्यार्थां बुडाले; रात्री उशिरापर्यंत एकाला शोधण्यात यश

गेवराई दि.18 मार्च – गेवराई तालूक्यातील गुळज भगवान नगर येथे कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थी बुडाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी घडली. बुधवारी रात्री उशिरा एकाचा मृतदेह सापडला असुन एकाचा शोध सुरु आहे.

(Two schoolboys drowned in canal; Success in finding one late at night)

गुळज भगवान नगर येथे आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेले दोन शाळकरी (schoolboys) विद्यार्थी दि.१७ मार्च बुधवार रोजी दुपारी दोनच्या सुमारास येथुन जवळच असलेल्या पैठण उजव्या कालव्यात (canal) पोहण्यासाठी गेले. शेख अरबाज (13) रा. पैठण व शेख नाशिर (१२) रा. रामपुरी अशी त्यांची नावे आहेत. सदरील दोन्ही मुले वाहत्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली.

सदर घटना घडल्यापासुन नातेवाईक त्यांचा शोध घेत असुन बीड येथील शोध पथकाच्या मदतीने रात्री उशीरा शेख अरबाजचा मृतदेह सापडला आहे. उमापुर पोलीसात (Police) घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी (Police) घटनेच्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरु होते. रात्री १० वाजता तळणेवाडी येथील सीआरचार वरील गेट वर येऊन नातेवाईक शेख नाशेर याचा शोध घेण्यासाठी येऊन थांबले होते. मात्र त्याचा शोध लागला नव्हता. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version