BEED24

कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठार… दोन गंभीर जखमी…

बीडः दि.६(प्रतिनिधी) नगर वरून बीडला जात असलेल्या अल्टो कार चालकांचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला दिली. या अपघातात (Accident) दुचाकी स्वाराचा जागीच मुत्यु झाला तर सुन आणि नातु गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी बीड धामणगांव नगर रोडवरील सांगवी पाटण येथे साडे अकराच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्टो कार चालक MH06-AF-2198 घेऊन नगर वरून बीडला जात असताना बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास कापशी वरून धामणगांव येथे लग्न समारंभासाठी जात असलेल्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात (Accident) दुचाकी स्वार एकनाथ गोल्हार (६२) रा.कापशी यांचा जागीच मुत्यु झाला. दुचाकी वर असलेले सुन आणि नातु गंभीर जखमी झाले आहेत. कार चालक अपघात घडताच फरार झाला.

Exit mobile version