BEED24

Two-wheeler thieves धारूर शहरात दुचाकी चोरांना रंगेहात पकडले; तीघे पोलिसांच्या ताब्यात.

किल्लेधारूर दि.3 अॉक्टोंबर – Two-wheeler thieves धारूर शहरातील कसबा विभागात नागरीकांनी रात्री उशीरा तीन मोटरसायकल चोरांना रंगेहात पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. या मोटरसायकल चोरानां चांगला चोप देण्यात आला. या तिघांवर पोलीस Police स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. ( Two-wheeler thieves caught red-handed in Dharur town; Three in police custody.)

या बाबत समजलेली माहीती अशी की, धारूर Dharur शहरातील कसबा विभगात शिनगारे गल्लीमध्ये गणेश हरिशचंद्र थोरात यांचे घराच्या गेट मध्ये लावलेल्या मोटरासायकल गेटचे कुलूप तोडून चोरून नेण्यासाठी हे चोर घरात शिरले. गेटचा आवाज आल्यामुळे सदर कुंटूंबीय जागे होऊन बाहेर आले. या मोटरसायकल चोरट्यांनी तिन पैकी दोन मोटर सायकल बाहेर गेटचे बाहेर काढल्या होत्या व तिसरी काढण्याचे तयारीत होते. या मध्ये बुलेट क्र एम एच 44- 0577, स्पेलंन्डर क्र एम एच 44 व्हि 1540 या बाहेर काढल्या होत्या तर स्पिंलेन्डर क्र. एम एच २६- जी. 3558 हि काढण्याचे तयारीत असताना या मोटरसायकलसह गणेश सुंदरराव बहीरे रा. धारूर Dharur, नवनाथ किसन आखाडे रा. बीड, ताबीज ताज पठाण रा.बीड या तिघांना या भागातील नागरीकांनी पकडून चांगलाच चोप दिला व धारूर पोलीस Police स्टेशनचे ताब्यात दिले. येथील सहायक पोलीस निरीक्षक विजय अटोळे यांनी या आरोपीना तात्काळ ताब्यात घेऊन यांचेवर कलम 379 भा.दं.वि नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करत आहे. हा गुन्हा उघडकीस आल्याने शहरात वा तालूक्यात वाढलेल्या मोटरसायकल चोरीवर आता अंकूश बसणार का ? या वर जोरदार चर्चा शहरात होत आहे.

Exit mobile version