किल्ले धारूर दि.29 जुन – धारुर तालुक्यातील मैंदवाडी येथील अशोक मधुकर मैंद हा ऊसतोड मजूर फौजदार झाला आहे. आई-वडिलांसह स्वत: ऊसतोड मजूर म्हणून काम करून कोणत्याही शिकवणीचा वर्ग न लावता जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ( MPSC ) परिक्षा उत्तीर्ण होऊन या युवकाने तरुणांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
अन धारुरचा ऊसतोड मजूर फौजदार झाला
फौजदार अशोक मैंद याचा धारुर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी स्वतः ऊसतोड मजुर म्हणून काम करत एक तरुण फौजदार (PSI) होतो ही अभिमानास्पद बाब असून युवकांनी त्यांची प्रेरणा घेवून आपल्या आयुष्यात यश संपादन करावे असे प्रतिपादन ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ गांजपूरचे संस्थापक सचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी ( OBC ) सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा.ईश्वर मुंडे यांनी केले. सत्कार समारंभास प्रा.ईश्वर मुंडे, भगवान पाटोळे, रामदास पाटोळे, मोहन चोले, रणजीत राठोड, शहाजी मैंद, केशव वाघमारे, मधुकर वाघमारे, कामा काळे, गौतम गायकवाड, महारुद्र मैंद, उत्तम अडागळे, बन्सीधर वैरागे, विनोद वैरागे, बंडू पाटोळे उपस्थीत होते.
मैंदवाडी या छोट्याशा गावातील ऊसतोड मजूर ( Sugarcane laborers ) म्हणून काम करणाऱ्या अशोक मैंद यांनी ईयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण वसंत विद्यालय केज येथे केले. ईयत्ता बारावी रामराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय केज पुर्ण करून पदवीचे शिक्षण वसंत महाविदयालय केज येथे पूर्ण केले. कोणताही शिकवणी वर्ग न लावता जिद्दीने यश संपादन केल्या बद्दल तालुक्यात अशोक मैंद यांचे कौतूक होत आहे.
नुकतेच अशोक मैंद यांनी पोलीस ॲकॅडमी ( Police Academy ) नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांना मुंबई पोलीस ( Mumbai Police ) येथे पदस्थापना मिळाली आहे. आपणास गरीबी व सर्व सामान्य कुटुंबातील परिस्थीतीची जाणीव असल्याने प्रमाणिकपणे जनतेची सेवा करेल असे मनोगत फौजदार अशोक मैंद यांनी व्यक्त केले. स्वतः ऊसतोड करुन मिळवलेल्या यशामुळे युवकांसाठी तो प्रेरणादायी ( inspiring ) ठरत आहे.
( Un Dharur’s cane laborer became faujdar; An inspiring journey of youth. )