BEED24

बीड जिल्ह्यात वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; वीजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन.

बीड दि.20 जुन – बीड जिल्ह्यात वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज दि.20 सोमवारी अनेक भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. यातच जिल्ह्यातील परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथे शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ( The unfortunate death of a farmer ) झाल्याची घटना समोर आली.

परळी शहर व परिसरात सोमवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. परळी येथून जवळच असलेल्या कन्हेरवाडी येथील शेतात झाडाखाली थांबलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याची दुर्घटना सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. यात शेतकरी जागीच ठार झाला आहे. माणिक बाबुराव मुंडे (वय 40) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

सोमवार (दि.20) दुपारी चारच्या सुमारास परिसरात अचानक पाऊस व वीजेचा कडकडाट सुरू झाला. वीजेच्या कडकडाटामुळे (lightning strike) कन्हेरवाडी ग्रामस्थ हादरले होते. शेतात पेरणी चे काम करत असलेले माणिक बाबुराव मुंडे पाऊस सुरू झाल्याने व विजेचा कडकडाट झाल्याने झाडा खाली थांबले होते. याचवेळी वीज झाडावर पडून त्यात त्यांचा मृत्यू झाला. परळी उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आला.

दरम्यान, बीड (Beed) जिल्ह्यात पावासाने दडी मारल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतात शेतकरी पेरणीसाठी सरसावला असून आज पावसाचे कमबॕक झाले आहे. यातच पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. माणिक बाबुराव मुंडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

( Unfortunate death of a farmer due to lightning in Beed district; The arrival of rain with thunderstorms. )

Exit mobile version