BEED24

महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या लाच स्वीकारण्याच्या व्हिडीओची धमाल…

पिंपरीःदि.१७(प्रतिनिधी)- पिंपरी येथे एका महिला वाहतूक पोलीस (Traffic Police) कर्मचाऱ्याचा एका दुचाकीचालक महिलेकडून अनोख्या पध्दतीने लाच स्विकारतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मेडियामध्ये (social media) चर्चेचा विषय ठरला असून हजारो दर्शकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. याबाबत पोलिस (Police) प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे.

वाहतूकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहनधारकावर जरब बसण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सतत कारवाईचा बडगा उभारला जातो. अशात बरेच वाहतूक कर्मचारी चिरिमिरी घेवून वारवाई टाळत असल्याचे दिसुन येते. असाच एक व्हिडीओ काल पिंपरी येथे कॅमेऱ्यात कैद झाला. या व्हिडीओत एक वाहतूक शाखेतील (Traffic Police) महिला कर्मचारी थेट आपल्या मागच्या खिशात लाच स्वीकारताना दिसत आहे. हा व्हिडिओ पिंपरी येथील साई चौक येथील असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत चौकशी करुन त्यानंतर योग्य कारवाई करण्यात येईल असे पिंपरी चिंचवडच्या वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस (Police) आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले आहे. या व्हिडीओने सोशल माध्यमात (Social media) धूम माजवली असून आता वरीष्ठ या महिलेवर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.

Exit mobile version