वडवणी दि.29 एप्रिल – Wadvani…वडवणी बाजार समितीचे सभापती दिनेश बन्सीधर मस्के (वय 45) यांचे छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे उपचार सुरु असताना रविवारी रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बाहेगव्हाण ता. वडवणी येथील वैष्णवी महाविद्यालयाच्या प्रांगणात आज सोमवार दि.29 रोजी हजारोंच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
वडवणी बाजार समितीचे सभापती दिनेश बन्सीधर मस्के (वय 45) हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर पुणे, औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. दि.२८ रविवारी छ. संभाजीनगर येथे उपचार सुरु असताना 12 वाजून 10 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई. वडिल, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. दिनेश मस्के हे दिलखुलास व हसतमुख व्यक्तीमत्व असल्याने बीड जिल्ह्यात त्यांचा मित्र परिवार मोठा होता. आज त्यांच्या पार्थिवावर बाहेगव्हाण ता. वडवणी येथील वैष्णवी महाविद्यालयाच्या प्रांगणात आज सोमवार दि.29 रोजी हजारोंच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी आमदार प्रकाशदादा सोळंके, माजी आ. केशवराव आंधळे. मा.आ. मोहनराव सोळंके, मा.आ. प्रा. सुनिल धांडे, मा. आ. राधाकृष्ण होके, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, विजयसिंह पंडित, जयसिंगभैय्या सोळंके, आशोक डक, बाबरी मुंडे, माधव निर्मळ, कल्याण आबुज यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.