बीड दि.9 जुन – बीड शहरातील नामांकित क्लासेस चालकाने (Coaching Class Owner) राहत्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची (Suicide) खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित क्लासेस चालकाने दोन दिवसांपुर्वीच क्लासेसच्या नवीन शाखेचे उद्घाटन केल्याची माहिती समोर येत आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही.
राजाराम धस (वय-40 रा. नाथसृष्टी, बीड) असे आत्महत्या केलेल्या क्लास चालकाचे नाव आहे. राजाराम धस हे बीड शहरामध्ये गेल्या वीस वर्षापासून खासगी क्लासेस चालवत होते. मूळचे केज तालुक्यातील सारणी गावचे रहिवासी असून त्यांचे वडील पोलीस दलात कार्यरत असल्याने ते बीड शहरात (Beed Crime) राहण्यास आहेत. काही वर्षे शहरातील जिज्ञासा करिअर अकॅडमी (Jidnyasa Career Academy) मध्ये शिक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी आठ वर्षापूर्वी शहरातील अंकुश नगर भागात स्वत:च ब्राईट स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केले होते.
राजाराम धस यांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुटुंबासह जेवण केले. त्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या खोलीत निघून गेले. मात्र, तीन वाजता त्यांचा लहान भाऊ उठला असता एका बंद असलेल्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. त्याने आत जाऊन पाहिले असता राजाराम यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Police Station) या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि राजाराम धस यांचा मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
दोन दिवसांपूर्वीच धस यांनी शहरामध्ये एका नवीन खासगी क्लासेसच्या शाखेचे उद्घाटन केले होते. त्यांनी जागा घेऊन हे क्लासेस उभे केले, मात्र, एका रात्रीतच असं काय झालं? की त्यांनी अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांनी रुग्णालयात गर्दी केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई-वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना नैराश्यातून (Depression) घडली की आणखी काही कारण आहे? याचा तपास पोलीस (Police) करीत आहेत.
( Well-known class driver suicide; The inauguration of the Classes branch took place two days ago. )