बीड जिल्ह्यात नामवंत पत्रकाराची आत्महत्या;
माध्यम क्षेत्रात खळबळ.

परळी दि.15 जुन – परळी (Parli) येथील ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ एकनाथ कदम यांनी आपल्या राहत्या घरी मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली असून सतत सामाजिक उपक्रमात सहभागी असणाऱ्या सच्चा समाजसेवक गमावल्याची प्रतिक्रिया येत आहेत.
प्रेमनाथ एकनाथ कदम हे गेल्या अनेक वर्षांपासुन पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. कदम यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यात सायकल फेरी काढून एड्स जनजागृती केली. बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीवर ते सदस्य होते. सतत सामाजिक उपक्रमात सहभागी होणारा सच्चा पत्रकार मित्र म्हणून त्यांची ओळख होती.
प्रेमनाथ एकनाथ कदम यांनी आपल्या राहत्या घरी मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती कळताच त्यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचे मृत्यू समयी 65 वर्ष वय होते. त्यांच्या पश्चात पत्नी आहे. आर्थिक विवेचनेतून आत्महत्या (Suicide) केली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे.
( Well-known journalist commits suicide in Beed district; Excitement in the media field. )