BEED24

धारुरहून बस प्रवास करता… पहा कसे आहेत नवीन तिकिट दर.

किल्लेधारूर दि.26 अॉक्टोंबर – आजपासून राज्य परिवहन महामंडळाकडून (State Transport Corporation) दरवाढ करण्यात आली असून जुन्या दरात तब्बल 17.17 टक्के वाढ झाली आहे. यामुळे सर्वच बसस्थानकातून नवीन दर (new ticket rates) आकारणी करण्यात येणार आहे.

(When traveling by bus from Dharur … see how the new ticket rates are.)

दिवसेंदिवस होत असलेली इंधन दरवाढ, टायर व इतर सुट्या भागाची दरवाढ यामुळे लालपरीच्या (ST Bus) प्रवास भाड्यात दरवाढ करण्यात आली आहे. याची अमंलबजावणी आज (दि.26) पासून करण्यात आली आहे. धारुर (Dharur) येथील बसस्थानकातून सुटणाऱ्या बस भाड्यात खालील प्रमाणे दरवाढ असणार आहे.

शहर           जुने दर     नवीन दर
केज                20        25
अंबाजोगाई       45        55
माजलगाव        60        70
बीड                 75        90
पंढरपूर           225      260
नांदेड             225      260
औरंगाबाद       280      315
पुणे                 415     480
मुंबई               800    1020

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात आली. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, अशा प्रवाशांकडून नव्या दरानुसार दरातील फरकातील रकमेची आकारणी केली जाईल, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version