BEED24

चिंताजनक…बीड जिल्ह्याची आजची संख्या सर्वाधिक; बीड जिल्हा कोरोना अपडेट

बीड दि.10 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 1063 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 120 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 953 जण निगेटिव्ह आली आहेत. आज आठव्या दिवशी सर्वाधिक 57 कोरोना पॉझिटीव्ह बीड तालुक्यात आढळली आहेत. बीड पाठोपाठ माजलगाव तालुक्यात 13 रुग्ण आढळून आली. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

(Worrying … Beed district has the highest number today; Beed District Corona Update)

1. बीड- 57                  7.माजलगाव-13
2. अंबाजोगाई-10         8.परळी-4
3. आष्टी- 11                 9.पाटोदा-2
4. धारुर-1                  10.शिरुर-1
5. गेवराई-5                 11.वडवणी-2
6. केज-4

वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.10 बुधवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या गेल्या आठवड्यापासून वाढली आहे.

दरम्यान, राज्यात आज कोरोनाने पुन्हा 8 हजारचा आकडा ओलांडला आहे. बीड जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता चिंता वाढली आहे. 31 मार्चपर्यंत सर्व आठवडे बाजार, कोचिंग क्लासेस बंदचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना ॲन्टीजन चाचणी बंधनकारक केली असून आज तहसीलदार धारुर यांच्या कडून अमलबजावणीचे आदेश काढला आहे.

Exit mobile version