BEED24

अभ्यासाच्या तणावात युवकाची आत्महत्या; चार्टर्ड अकाऊंटट होण्याचे स्वप्न भंगले.

बीड दि.25 मे – बीड शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अभ्यासाच्या तणावातून एका 21 वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार बीड शहरातील पांगरी रोड भागातील शिवतेज कॉलोनीत राहणाऱ्या वरद जीवनसिंग जव्हेरी (वय 21) या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. वरद हा सीए व बीकॉमचे शिक्षण घेत होता. मंगळवारी (दि.24) रात्री त्याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला.

मंगळवारी मयत वरदची आई बारामतीला नातेवाईकांकडे गेली होती. तर वडील जीवनसिंग जव्हेरी हे धोंडिपुरा येथील अकाऊंट अॉफीसला होते. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास वडील घरी परत आल्यानंतर वरद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, मयत वरदचे चुलते संतोष जव्हेरी यांनी वरदने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेतल्याचे सांगितले.

दरम्यान, शिवाजी नगर पोलिस ठाण्यात सदर घटनेची आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पंचनाम्यानंतर शासकीय रुग्णालयात मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर घटनेमुळे बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

( Youth suicide in study stress; The dream of becoming a chartered accountant was shattered. )

Exit mobile version