अंबाजोगाई वगळता जिल्ह्याला कोरोनाचा विळखा

रुग्ण संख्येची अर्धशतकी खेळी

बीड– बीड जिल्ह्यातील  अकरा तालुक्यापैकी दहा तालुक्यावर कोरोनाचा विळखा आवळला असून अंबाजोगाई वगळता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५५ झाली आहे.

कोरोनामुक्त असलेल्या बीड जिल्ह्यात दि.१६ मे रोजी माजलगाव व गेवराई तालुक्यात कोरोना बाधित आढळून आल्यानंतर खळबळ माजवली. तत्पुर्वी आष्टीचा  आढळलेला रुग्ण अहमदनगर मध्ये होता. यामुळे जिल्हा कोरोनामुक्तच समजला जात होता. १६ मे नंतर मात्र जिल्ह्यात दररोज नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण सुरुच आहे. माजलगाव, गेवराई नंतर केज, वडवणी, बीड, पाटोदा व धारुर तालुक्यात बाधित आढळून आली.  आष्टीत एकाच दिवशी आढळून आलेल्या रुग्णांमूळे जिल्ह्याची चिंता वाढली. कालपर्यंत अंबाजोगाई, परळी व शिरुर कासार तालुके कोरोनामुक्त होती. मात्र काल आलेल्या नवीन अहवालात परळी व शिरुर तालुक्यातील रुग्णाचा समावेश होता. जिल्ह्यातील अकरा पैकी दहा तालुक्यात कोरोनाने पाय पसरले. कोरोना बाधित रुग्णांत बहुतेक रुग्ण मुंबई येथून आलेली आहेत. जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात मुंबईहून येणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने दि.२६ पासून मोठ्या प्रमाणात सूट दिलेली असून यामुळे चिंता वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!