कोरोंना विशेष

अंबेवडगावच्या तीन “कोवीड पाँझिटीव्ह” रुग्णांना डिस्चार्ज…

अंबेजोगाई स्वा.रा.ति. रुग्णालयात सुरु होते उपचार


अंबाजोगाई दि.१६(प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड रुग्णालयात ४ जून रोजी सायंकाळी दाखल करण्यात आलेला धारुर तालुक्यातील अंबेवडगाव येथील  एक पुरुष रुग्ण आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणारे दोन महिला रुग्ण अशा एकुण तीन कोवीड पाँझिटीव्ह रुग्णांना आज पुर्णपणे बरे झाल्यानंतर आज (१६ जून) सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी दिली.

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड रुग्णालयात ४ जून रोजी धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथील ६५ वर्षीय दाखल करण्यात आलेला रुग्ण कोवीड पाँझीटिव्ह निघाल्या नंतर त्याच्यावर मेडिसीन विभाग प्रमुख तथा कोवीड सेंटरचे प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु करण्यात आले होते. धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथील हा रुग्ण गेली कांही वर्षापासून मुंबई येथे वास्तव्यास होता. मुंबई येथे कोरोना रोगाच्या प्रसारानंतर तो आपल्या गावी आला होता. प्रकृती अस्वस्थतेमुळे या रुग्णावर सुरुवातीला माजलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करुनही तो बरा होत नसल्यामुळे त्यास स्वाराती च्या रुग्णालयात आणण्यात आले होते. यारुग्णास कोरोनाची लक्षणे आढल्यामुळे त्याचा स्वँब तपासणी साठी पाठवण्यात आला होता, त्याचा रिपोर्ट पाँझिटीव्ह आल्यानंतर त्यास स्वारातीच्या कोवीड रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले होते. सदरील रुग्ण कोवीड पाँझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या घरातील इतर लोकांची कोवीड टेस्ट घेण्यात आल्यानंतर दोन महिलांची टेस्ट ही पाँझिटीव्ह आढळून आली होती. यामुळे या दोन महिलांवर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोवीड केअर सेंटर मध्ये उपचार करण्यात आले होते. या दोन महिला रुग्णामध्ये कोवीड ची लक्षणे आढळून येणे बंद झाल्यामुळे १० दिवसाच्या उपचारानंतर आजच त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्वाराती कोवीड रुग्णालयातील रुगण हा डायबेटिक रुग्ण कसल्यामुळे तो बरा करणे हे तसे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आव्हानच होते. मात्र या रुग्णावर योग्य प्रशिक्षण पुर्ण केलेल्या तज्ञ डॉक्टरांनी त्याच्या आरोग्याची पुर्ण काळजी घेत सतत १४ दिवसाच्या उपचारानंतर त्यास पुर्ण बरे केले व आज (१६ जून) सायंकाळी त्यास डिस्चार्ज देण्यात आला. स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड रुग्णालयात दाखल झालेला पुरुष रुग्ण आणि तालुका आरोग्य अधिकारी डाँ. बालासाहेब लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आलेल्या दोन महिला रुग्ण उपचार होवून पुर्णपणे बरे करण्यात डॉक्टरांना यश आल्याबद्दल या रुग्णावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारीका व संबंधित कर्मचाऱ्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!