अंबेवडगावच्या दोन तर जिल्ह्यातील २३ व्यक्तींच्या अहवालाची प्रतिक्षा

बीड दि.८(प्रतिनिधी) आंबेवडगाव येथील दोन सह जिल्हयातील आज एकूण २३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात असून आज रात्री या सवॕबचा अहवाल प्राप्त होणार आहे.
कॉविड १९ च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब आज सकाळी ५.१५ वा. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
१)जिल्हा सामान्य रुग्णालय १०
२)स्वा.रा.ती.ग्रा.वै.महा. आंबाजोगाई ०३
३)उपजिल्हा रुग्णालय गेवराई ०४
४)उपजिल्हा रुग्णालय परळी (वै) ०६
यात अंबाजोगाई येथून पाठवण्यात आलेल्यामध्ये धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथील दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या दोन व्यक्तीच्या स्वॕबचा समावेश आहे.