अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोलिसात गुन्हा नोंद

किल्लेधारूर दि.१७ (वार्ताहर) पोलीस स्टेशन हद्दीतील तरनळी ता.केज येथे अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचे पाहून शेतात मजूरी साठी आलेल्या एक जनाने तिला धमकी देऊन सात महिन्यापुर्वी लैंगीक अत्याचार केला. हा प्रकार मुलीला दवाखान्यात घेऊन गेल्या वर उघड झाला. भिती पोटी मुलीने काही सांगीतले नाही. हा प्रकार उघडा झाल्यानंतर या अत्याचारीत मुलीचे तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस या करत आहेत.

धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील तरनळी येथे शेतात बाजरी काढण्यासाठी आलेल्या एक जनाने डोंगरावर गावा पासून दिड कि.मी. अंतरावर असणारे शेतात अल्पवयीन अत्याचारीत मुलगी एकटी आल्याचे पाहून तिच्या वर लैंगिक अत्याचार केले व कोणास सांगशील तर बघ अशी धमकी दिली. हा प्रकार गतवर्षी दिवाळी अगोदर घडला. माञ या अल्पवयीन मुलीने कोणाला भिती पोटी सांगीतले नाही. दोन तिन दिवसापुर्वी मुलीचे पोटात दुखू लागल्याने तिला दवाखान्यात घेऊन गेले असता ति गर्भवती राहील्याचे लक्षात आले. तिचे वडीलानी तिला विचारले असता हा प्रकार सांगीतला संबंधीत अत्याचारीत अल्पवयीन मुलीचे तक्रारी वरून संबंधीत आरोपी सतिश सखाराम सरवदे वय २२ वर्ष यांचे विरूध्द बाल अपराध संरक्षण अधिनीयम २०१२ कलम ३७६,५०६ भा.द. वि नुसार गुन्हा नोंदवीण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस या करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!