अल्पवयीन विवाहितेला पळवून नेवून अत्याचार

वडवणीत गुन्हा नोंद

वडवणी :- लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रियकराने अल्पवयीन नवरीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार  केल्याची घटना तालुक्यातील खडकी येथे घडली असून प्रियकारा विरुद्ध अल्पवयीन नवरीच्या पतीने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रियकराला अटक केले असुन त्याला माजलगाव न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीसांनी सासरचे ५ व माहेरचे ८ असे एकुण १३ जणांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कायद्याप्रमाणे यापुर्वीच गुन्हा दाखल केला होता.

वडवणी तालुक्यातील खडकी येथील मल्हारी सिताराम कांबळे (२५) याचे कामखेडा येथील एका अल्पवयीन मुलीशी दिनांक १४ जून रोजी लग्न झाले होते. दुसऱ्या दिवशी १५ जून रोजी खडकी येथे ते दोघे देवदर्शनासाठी गेले होते. त्याच्यानंतर रात्री ८ वाजता ती अल्पवयीन नवरी शौचालयासाठी गेली असता ती परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. म्हणून दिनांक १८ जून रोजी वडवणी पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार तिचा नवरा मल्हारी सिताराम कांबळे यांनी दिली होती.
त्यानंतर पोलिसांच्या तपासात अल्पवयीन नवरी हीला राज श्रीमंत कांबळे (१९) वर्ष रा. सोनेगाव तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद याने पुणे येथे पळवुन नेले होते. त्यांना दिनांक १ जुलै रोजी बीड येथुन ताब्यात घेतले व प्रियकर राज श्रीमंत कांबळे याच्यावर अल्पवयीन मुलीचा नवरा मल्हारी कांबळे यांच्या फिर्यादीनुसार अपहरण, बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील आरोपीला माजलगाव न्यायालया समोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जयसिंग परदेशी हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!