प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या आई-वडिलांचा मुलीनेच काढला काटा…

इंदूरः दि.१९- प्रेमसंबंधाला आई-वडिलांनी विरोध केल्याने पोटच्या मुलीनेच प्रियकरासोबत मिळून आपल्या जन्मदात्यांची हत्या (murder) केल्याचे उघड झाले आहे. मुलगी अल्पवयीन असून तिच्या प्रियकरासोबत राजस्थान येथे पळून जात असताना रतलाम पोलिसांनी (Police) त्यांना अटक केली.
गुरुवारी इंदूर येथील रुक्मिणी नगर येथे पोलीस ज्योती प्रसाद शर्मा आणि त्यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान घटनास्थळावरून शर्मा यांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याने पोलिसांना (Police) तिच्यावर दाट संशय होता. त्यानुसार त्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. अखेर रतलाम पोलिसांच्या मदतीने आरोपींना पकडण्यात यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडिलांची हत्या (murder) करून अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकरासोबत बाईकने रतलामच्या दिशेने राजस्थानला निघाली होती. दरम्यान त्यांनी आपला मोबाईल बंद ठेवला होता. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांनी आपला मोबाईल सुरु केला असता पोलिसांना त्यांचे लोकेशन शोधण्यात यश आले. त्यानुसार रतलाम पोलिसांना (Police) या दोघांचे फोटो पाठवून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. मुलीच्या प्रेमसंबंधांना आई-वडिलांनी विरोध केल्याने त्या रागातून त्यांनी ही हत्या केली आहे. आधी आईची नंतर वडीलांची हत्या (murder) केली. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीने हत्येचा डाव आधीच आखला होता. बुधवारी रात्री ज्योती प्रसाद यांचा मुलगा त्याच्या आजोबांकडे झोपायला गेला होता. ती संधी साधत मुलीने आपल्या प्रियकराला सकाळी घरी बोलावले आणि कुत्र्याला खाली फिरवण्यासाठी घेऊन गेली. त्यावेळी प्रियकराने घरात घुसून आधी तिच्या आईची तोंड दाबून हत्या (murder) केली. त्यानंतर त्यांनी ज्योती प्रसाद यांचीही हत्या केली.