जिल्ह्यात महिला पदवीधर मतदारांची संख्या कमी; जाणून घ्या तालुका निहाय स्थिती

बीडः दि.३(प्रतिनिधी) जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघात Graduates constituency  महिला मतदारांची नोंदणी अत्यल्प असुन यामागिल कारणे शोधण्यात निवडणूक विभागाला Election अपयश आले आहे. प्रत्येक मताला महत्व असलेल्या पदवीधर निवडणूकीत Graduates constituency Election महिलांचा टक्का वाढणे महत्त्वाचे समजले जात आहे. जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ २६ टक्के आहे.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक Graduates constituency Election प्रक्रिया सुरु झाली आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ इतर मतदारसंघाच्या तुलनेत मोठा आहे. ७८ तालुक्यातील जवळपास दहा हजार गावाचा हा मतदारसंघ आहे. पदवीधर निवडणूकीसाठी जिल्ह्यात एकुण ६१६७४ पदवीधर मतदारांची नोंदणी झालेली आहे. यात पुरुष मतदार ४८६४५ तर महिला मतदार १३०५९ आहेत. यात महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत केवळ २६ टक्के आहे.

तालुका निहाय पदवीधर मतदार

तालुका         एकुण    पुरुष     महिला   

बीड           १६०५१   ११८२४    ४२२७

पाटोदा         २३५१      १९४३      ४०८

आष्टी           ४७३७      ३९७२      ७६५

शिरुर का.     २४८२      २११३      ३६९

वडवणी        १५३३      १३३२      १०१

अंबाजोगाई    ८५६६     ६१०६     २४५९

माजलगाव     ५२२८      ४२९८      ९३०

केज              ५९२५      ५०२७    १२२३

धारुर             २६६३      २२८१      ३८०

परळी            ६३५९       ५०६४    १२९५

गेवराई           ५४५४       ४६८४      ७७०

एकुण          ६१६७४     ४८६४५   १२८६०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!