कोरोंना विशेष
आज धारुरचे ३८ स्वॅब तपासणीसाठी

किल्लेधारूर दि.३(वार्ताहर) आज तालुक्यातील ३८ लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई स्वा.रा.ति. प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे जास्तीत जास्त स्वॅब नमुने घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज राज्यातील हॉटस्पॉट झोन मधून आलेल्या व ज्यास ५ ते १४ दिवस पुर्ण झालेत अशा तालुक्यातील ३६ व्यक्तींचे तर २ आरोग्य कर्मचाऱ्यांची स्वॅब घेण्यात आली आहेत. यात तेलगाव १०, रुईधारुर ६, देवठाणा ६, मोरफळी ६, चिंचपूर ४, मैंदवाडी ४ लोकांचा समावेश आहे. आज सांयकाळ पर्यंत या नमुन्याचे अहवाल येणार असल्याची माहिती डॉ. शेकडे यांनी दिली.