आज धारुरमध्ये कोरोनाचा उद्रेक; जिल्ह्यात ॲन्टीजन मध्ये २१०;

किल्लेधारूरः दि.१८;आगस्ट- काल पाठवलेल्या ५९ अहवाला पैकी ११ जनांचे व ॲन्टीजन टेस्टमध्ये ४ असे १५ अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत. शहरातील १५ मुर्ती विक्रेता पैकी एकाची ॲन्टीजन टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. आज धारुरमध्ये कोरोनाचा उद्रेक दिसुन आला. जिल्ह्यातील पाच लॉकडाऊन असलेल्या शहरात आज करण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्ट मध्ये २१० व्यापारी पॉझिटीव्ह आली आहेत.

शहरात आज १९ व्या दिवशी कोरोनाचा कहर पहायला मिळाला. आज एकाच वेळी १५ रुग्णांची भर पडली आहे. हि आजवरची सर्वाधिक संख्या आहे. जिल्ह्यातील पाच लॉकडाऊन असलेल्या शहरात सुपर स्प्रेड असलेल्या व्यापाऱ्यांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. या ॲन्टीजन टेस्ट मध्ये अंबाजोगाई शहरात १६९७ पैकी ३७, आष्टीत ६२९ पैकी १७, केज मधील ६८४ पैकी १९, माजलगाव १४२५ पैकी ७१, परळी १३२१ पैकी ६६ अशा एकुण ५७५६ पैकी २१० व्यापारी पॉझिटीव्ह आली आहेत. काल धारुर मधून ५९ लोकांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवण्यात आली होती. यापैकी ११ पॉझिटीव्ह आली आहेत. तर ४ जन ॲन्टीजन टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळली. यापैकी दोन केजमध्ये तर एक फकीरजवळा येथील माजलगाव येथे ॲन्टीजन टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आली आहेत. आज आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णात येथील आश्रमातील बहुतेक वयोवृध्दांचा समावेश आहे. याशिवाय शहरातील गायकवाड गल्ली, क्रांति चौक व मठ गल्ली, शिनगारे गल्लीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.  आरोग्य विभागाच्या वतीने सदरील रुग्णाच्या संपर्काचा शोध सुरु केला आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. रात्री उशिरा बाहेरुन येणाऱ्या पोर्टल वरील नोंदीनुसार संख्येत बदल होवू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!