

बीडः आज जिल्ह्यातील २५८ स्वॅब अहवालापैकी सहा जन पॉझिटीव्ह आली असून यात धारुर येथील बाधित बालकाच्या कुटूंबातील एकाचा समावेश आहे. बीड व गेवराई च्या मयत झालेल्याचे अहवाल निगेटिव्ह आली आहेत. आज आलेल्या सहा पॉझिटीव्ह रुग्णांमुळे जिल्ह्याचा आकडा १९९ वर पोहोचला आहे. अंबाजोगाई प्रयोगशाळे पाठवलेल्या अहवालांची आकडेवारी जाहीर होण्यास काही वेळ लागणार आहे. धारुर येथील आकडा एकाने वाढला असून शहरातील सदरील व्यक्ती ही तिसरी आहे.




