आज शहरातील मुर्ती विक्रेत्यांची ॲन्टीजन टेस्ट

किल्लेधारूर दि.१८(वार्ताहर) आज शहरातील मुर्ती विक्रेत्यांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात येणार असुन या टेस्टमध्ये स्वंयस्फुर्तिने विक्रेत्यानी सहभागी व्हावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

सध्या सर्वत्र कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रादुर्भाव रोकण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय योजिले जात आहेत. सध्या सण उत्सव काळ असुन याकाळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. बैल पोळा व गणेश उत्सवात अनेक लहान मोठे व्यापारी मुर्ती विक्रीचा व्यवसाय करतात. या विक्री केलेल्या मुर्ती मुळेही कोरोना संसर्ग वाढू शकतो. याधर्तीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर अशा स्थानिक मुर्ती विक्रेत्यांची रँपिड ॲन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सांयकाळी ४ वाजता धारुर शहरातील  येथील कोविड केअर सेंटरमध्ये मुर्ती विक्रेते व्यवसायिकांची ॲन्टीजन टेस्ट होत असुन नागरिकांनी ॲन्टीजन टेस्ट केलेल्या विक्रेत्याकडूनच मुर्ती घ्यावी असे आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!