अन आ. सुरेश धस यांची झाली निर्दोष मुक्तता…

आष्टी दि.३०(वार्ताहर)- ऊसतोड मजूरांच्या मदतीसाठी जिल्हाबंदी असतानाही दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी विधानपरिषदेचे आ.सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर एप्रिल महिन्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाबंदी आदेश डावलून इतर जिल्ह्यात प्रवेश केल्या प्रकरणी आष्टी पोलीसांनी (Police) गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणाची अंतिम सुनावणी बुधवार दि.३० डिसेंबर रोजी झाली. ज्यामध्ये आ.सुरेश धस यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड मजूर आपआपल्या गावी परतत असताना खेड ता.कर्जत जि.अहमदनगर येथे या ऊसतोड मजूरांना पोलिसांनी अडवणूक करुन मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. याची माहिती मिळताच आ.सुरेश धस यांनी खेड येथे जाऊन या ऊसतोड मजूरांना मारहाण का केली म्हणून पोलीसांना जाब विचारत ठिय्या आंदोलनही केले होते. त्यामुळे आ.सुरेश धस यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी तसेच जिल्हाबंदी असतानाही इतर जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी त्यांच्यावर आष्टी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाची बुधवारी अंतिम सुनावणी झाली. आ.सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावतीने ॲड. बाबूराव अनारसे व त्यांचे सहकारी संग्राम गळगटे यांनी बाजू मांडली त्यानंतर सबळ पुराव्याअभावी आ.धस यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!