राजकीय

Munde’s resignation धनंजय मुंडे यांनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा,

66 / 100

मुंबई दि.3 मार्च – Munde’s resignation खंडणी प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. घटनेच्या तपासात सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटमधून संतोष देशमुख यांना मारहाण होत असल्याचे काही फोटो समोर आले आहेत. ते फोटो व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण होवून मंगळवारी ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कठोर भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा स्वियसहाय्यकाच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. यामध्ये परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडसह मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार यांना अटक करून त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आला आहे. याप्रकरणात नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अश मागणी केवळ विरोधकच नव्हे तर, सत्ताधारी आमदारांकडूनही केली जात होती. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनीही हे प्रकरण लावून धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यपालांची भेट घेतली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!