कोरोंना विशेष
आज ५० स्वॅब अहवालाची प्रतिक्षा; इतर ठिकाणाहून २ पॉझिटीव्ह

किल्लेधारूर दि.२६(वार्ताहर) काल धारुरचे ५० लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. या स्वॅबचा चा अहवाल रात्री प्राप्त होणार आहे. दरम्यान धारुर तालुक्याची कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्येत आज सायंकाळपर्यंत २ ने वाढ झाली आहे.
गेली २९ दिवस दररोज शहर व तालुक्यात रुग्ण आढळून येण्याची शृंखला सुरुच आहे. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ५० लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. या स्वॅबचे अहवाल रात्री प्राप्त होणार आहेत. तालुक्यातील इतर ठिकाणाहून गेलेल्या दोघांची पॉझिटीव्ह म्हणून पोर्टल वर नोंद झाली आहे. यात गांवदरा व आडहिंगणी येथील व्यक्तींचा समावेश आहे.