अबब आज येवढ्या स्वॅब अहवालाची प्रतिक्षा; विलगीकरण कक्षाची आजची स्थिती पहा….

किल्लेधारूर दि.२६(वार्ताहर) काल धारुरचे ७४ लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. या स्वॅबचा चा अहवाल रात्री प्राप्त होणार आहे. दरम्यान धारुर तालुक्याची कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढून १३० पेक्षा जास्त झाली आहे.
गेली २७ दिवस दररोज शहर व तालुक्यात रुग्ण आढळून येण्याची शृंखला सुरुच आहे. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ७४ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. या स्वॅबचे अहवाल रात्री प्राप्त होणार आहेत. तालुक्याची कोरोना रुग्ण संख्या १३० च्या पुढे सरकली आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील ५ जन कोरोनामुळे दगावली आहेत. येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या ७७ पैकी आज उपचार घेत असलेले रुग्णांची संख्या २६ तर आजपर्यंत उपचार घेऊन घरी गेलेल्यांची संख्या ४० आहे. पुढील उपचारासाठी संदर्भीत केलेले रुग्ण ११ आहेत.