जिल्हाधिकारी धारुरमध्ये; पत्रकार देणार निवेदन-महाजन

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे आज दि.५ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असुन १०.३० वाजता धारुर येथील पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन देणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन यांनी दिली.
तालुक्यातील विविध विभागाच्या कामाचा आढावा यावेळी ते घेतील. विशेष करुन आरोग्य विभागाकडून कोरोना विषयक समस्या व उपाय, शेतकऱ्यांच्या पिककर्ज, कर्जमाफी, विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे. आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलणार आहेत. यावेळी पत्रकारांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन यांनी दिली. यानंतर जिल्हाधिकारी केजकडे रवाना होतील.