आता स्वस्त धान्य दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकाची नियूक्ती
वाढत्या तक्रारीमुळे प्रयोग

किल्लेधारूर दि.१२ (वार्ताहर ) कोरोनाच्या पार्श्वभूमी वर स्वस्त धान्य दुकानातून शिधापञीका धारकाना धान्य वितरीत होत असताना वाटपावर नियंत्रण ठेवण्यासाठी व व्यवस्थीत धान्य वितरण होण्यासाठी समन्वयक म्हणून प्रत्येक दुकानावर एका शिक्षकाची नियूक्ती केली असून या व्यवस्थेतून नियंत्रण ठेवता येणार का असा प्रश्न निर्माण होत आहे.
कोरोना मुळे सुरू असणाऱ्या लाॕकडाऊन काळात नागरीकांना तालूक्यातील 120 स्वस्त धान्य दुकानातून मालाचे वितरण होत आहे. सदरील वितरण व्यवस्थीत व्हावे व तक्रारी वाढू नयेत यासाठी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानावर जि. प. च्या एका शिक्षकाची नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वयक म्हणून नियूक्ती करण्यात येत आहे. वाटप काळात या दुकानात संबंधीत शिक्षकांनी उपस्थीत रहावे असे आदेश तहसीलदार व्हि. एस. शिडोळकर यांनी काढले आहेत.
या आदेशाने स्वस्त धान्य दुकानातील वाढत्या तक्रारी कमी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.