आधार माणुसकीचा उपक्रमात जीवनावश्यक वस्तुचे निराधारांना वाटप

किल्लेधारुर दि.१७(वार्ताहर) अंबाजोगाई येथील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेच्या वतीने आधार माणुसकीचा या उपक्रमातुन किल्लेधारुर शहर व सोनीमोहा येथील वयोवृध्द, अपंग, निराधार गरीब गरजवंताना दि.१७ शुक्रवारी रोजी जीवनावश्यक वस्तुचे वितरण करण्यात आले.
कोरोना वायरसचा वाढता प्रदुर्भाव पाहाता लाॕकडाऊन असल्याने निराधार मजूर नागरीकांना हाताला मजूरी नसल्याने उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न उपस्थीत होत आहे. अशात अशा नागरीकांना मदतीची गरज असताना अंबाजोगाई येथील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था व मैञी ग्रुप यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या आधार मानुसकीचा या उपक्रमा अंतर्गत
शहरातील संभाजीनगर भागातील सात व सोनीमोहा येथील सात जणानां या वस्तुचे वितरण सामाजीक अंतर ठेवुन करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रमुख ॲड.संतोष पवार, श्री नागेश औताडे, श्री अमृतराव महाजन, संकेत तोरंबेकर, ज्ञानेश पाटील, श्री कुलकर्णी सह पत्रकार प्रकाश काळे, संदीपान तोंडे, सुनील कावळे, हरीभक्त परायण श्री तोंडे महाराजसह ग्रामस्थ उपस्थित होते.
——————————————————————–
सोनीमोहा येथील लक्ष्मणराव अडागळे यांच्या घरी जीवनावश्यक वस्तु देताना त्याचे चार फुट उंचीचे पत्र्याचे कुड वय सत्तरीच्या पुढे पायावर धड उभा राहता येत नाही.सोबतच दृष्टिही गेलेली असताना त्यांनी मदत देणारे देवदुत असल्याचे सांगीतले