माझं गाव

घरात घुसले रानडुक्कर… सोनिमोहा गावात रानडुकराची दहशत, धारुर वनविभागाचे पथक गावात.

किल्ले धारूर दि.26 एप्रिल – धारुर (Dharur) तालुक्यातील सोनिमोहा या गावात रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून एका घरात रानडुक्कराने मोठी नासधुस केली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर वन विभागाचे पथक गावात दाखल झाले असून रानडुक्कराला जेरबंद करण्यात यश आले.

धारुर तालुक्यातील सोनिमोहा गावात आज मंगळवार दि.26 रोजी सकाळी सात ते आठच्या सुमारासा रानडुकराने (Wild Boar) धुमाकूळ घातला. गावातील श्रीरंग साठे यांच्या घरात शिरुन घरातील वस्तू अस्ताव्यस्त केल्या. भयभीत झालेल्या कुटूंबाने गावकऱ्यांना मदतीचे आवाहन केले. यावेळी ग्रामस्थांनी धारुर वनविभागाला (Forest Department) माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी चिकटे, वनपाल वरकड यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी संभाजी पारवे यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना झाले. यावेळी धारुर येथून डुक्कर पकडण्यासाठी निष्णात असणाऱ्या युवकांना पाचारण करण्यात आले. जवळजवळ अर्धातास अथक प्रयत्न करुन रानडुकराला जाळ्यात अडकवून जेरबंद करण्यात आले.

वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने खाजगी वाहनातून सदर जेरबंद रानडूक्कर धारुर येथील कार्यालयाकडे हलवले असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानूसार रानडूक्कराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती पारवे यांनी दिली. यावेळी गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. परिसरात रानडुक्करांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून पिकांची नासाडी करत आहेत. यांचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

( A swarm of wild boar in Sonimoha village; Dharur Forest Department team in the village.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!