आरोग्य सेतू अँपमुळे धारुरमधून एकाचा स्वॅब घेतला

किल्लेधारूर दि.११(वार्ताहर) शहरा लगतच्या गोपाळपुर येथील एका व्यक्तीस आरोग्य सेतू ॲपमध्ये हायरिस्क दाखवल्याने वरिष्ठांच्या सुचनेवरुन त्याचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले.

आरोग्य सेतू अँप मध्ये हायरिस्क दाखवत असल्याचे आरोग्य विभागाकडून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. यामुळे आज धारूर तालुक्यातील गोपाळपूर येथील व्यक्तीस स्वॕब साठी केज येथे पाठवण्यात आले आहे. सदरील व्यक्ती १३ मे रोजी कोपरखैरने मुंबई येथून आलेला आहे. केज येथे आढळून आलेला रुग्ण देखील राज्याच्या आरोग्य विभागाला आरोग्य सेतू ॲपच्या अलर्टमधूनच हायअलर्ट आढळला होता. उद्या या स्वॕब नमुन्याचा अहवाल येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!