आश्चर्य… बारा कोरोना बाधित आढळलेल्या आश्रमात चोरी…

किल्लेधारूर दि.२५(वार्ताहर) काही दिवसांपुर्वी कोविड-१९ चा प्रादुर्भाव होवून १२ साधकांना बाधा झालेल्या चिंचपूर रोडवरील गिता ज्ञान आश्रमात रात्री अज्ञात चोरट्यांनी कोरोनाची कसलीही भिती न बाळगता धुमाकूळ घातल्याचे दिसुन आले असून माहिती कळताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस रवाना झाल्या आहेत.
येथील चिंचपूर रोडवर महानुभाव पंथाचे कृष्ण मंदिर व गिता ज्ञान आश्रम आहे. या आश्रमात पाच पुरुष व ८ वयोवृध्द महिला साधक संसार त्यागून इश्प्रार्थनेसाठी निवास करतात. काही दिवसांपुर्वी या आश्रमातील १३ पैकी १२ साधकांना कोरोनाची बाधा झाली होती. यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या आश्रमाला ताळे लावण्यात आलेले आहे. आज दि.२५ मंगळवार रोजी सकाळी आश्रमाची दारे कुलूप तुटलेल्या आवस्थेत व परिसरात पेट्यांची तोडफोड केलेले आढळून आले. प्राथमिक पाहणीनुसार येथे रात्री चोरट्यांनी डल्ला मारल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना माहिती कळताच सहायक पोलिस निरिक्षक सुरेखा धस घटनास्थळी रवाना झाल्या असुन बाधित व प्रतिबंधित क्षेत्र असल्याने सर्व नियमांचे पालन करुन तपास करणार असल्याचे त्यांनी बीड२४ न्यूजशी बोलताना सांगितले.