माझं गाव
passed away… माजी नगरसेवक राजमोहन गायसमुद्रे यांचे निधन.

किल्लेधारुर दि.4 नोव्हेंबर – passed away… धारुर Dharur नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजमोहन गायसमुद्रे यांचा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे छ. संभाजी नगर (औरंगाबाद) येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. ( Former corporator Rajmohan Gayasamudre passed away.)
राजमोहन माणिक गायसमुद्रे यांना दि.2 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा धक्का आला. यानंतर त्यांना छ. संभाजी नगर (औरंगाबाद) येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. आज सकाळी 11 वाजता उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. ते 1991 – 1995 मध्ये धारुर Dharur नगर परिषदेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर धारुर येथे कसबा विभागातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.