धक्कादायक … एकाच खोलीत दाम्पत्याने घेतला गळफास; पत्नी 8 महिन्यांची गर्भवती.

गंगाखेड दि.14 एप्रिल – गंगाखेड (जि.परभणी) तालुक्यातील मसनेरवाडी गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका दाम्प्त्याने (couple) टोकाचा निर्णय घेवून राहत्या घरातील एका खोलित गळफास घेवून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. यात पतीचे निधन झाले असून 8 महिन्याची गर्भवती पत्नी बचावली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मसनेरवाडी येथील रहिवासी माधव भाऊसाहेब मिसे (वय 30) आणि अरुणा यांचा विवाह सात वर्षापूर्वी मोठ्या थाटात झाला आहे. या दाम्प्त्यास दोन मुली आहेत. आज सकाळी मिसे पती-पत्नीने त्यांच्या खोलीतून बाहेर आली नाहीत म्हणून माधव यांचा भाऊ आणि ग्रामस्थांनी खोलीच्या खिडकीतून आत डोकावले.
यावेळी ग्रामस्थांना आतील चित्र पाहून धक्का बसला. यावेळी खोलीत एका आडूला दोघांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. तात्काळ दरवाजा तोडून ग्रामस्थ खोलीच्या आत गेले. यावेळी माधव याला गळफास बसल्याने मृत झालेल्या अवस्थेत तर गळफास तुटल्याने अरुणा बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तत्काळ अरूणाला उपचारासाठी गंगाखेड (Gangakhed) येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने अरुणाला अधिक उपचारासाठी परभणी (Parbhani) येथे हलविण्यात आले आहे. अरुणा या 8 महिन्यांच्या गर्भवती (Pregnant) असल्याने काळजी घेतली जात आहे. दाम्पत्याने असा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
( Shocking … The couple took a hangover in the same room; Wife 8 months pregnant. )