उदयसिंह दिख्खत यांचे वतीने पाचशे गरजूना जिवनवाश्यक वस्तूचे किट चे वितरण

किल्लेधारूर दि.१४(वार्ताहर ) धारूर येथील उद्योजक व भाजपाचे नेते उदयसिंह दिख्खत यांनी शहरातील व परीसरातील गरजूना जिवनावश्यक वस्तूचे किट चे वितरण मान्यवराचे उपस्थीतीत व नियमाचे पालन करत करण्यात आले.
धारूर शहरातील उद्योजक सामाजीक कार्यकर्ते उदयसिंह दिख्खत यांनी कोरोना चे पार्श्वभूमी लाॕकडाऊन मुळे मजूर वर्गा वर उपासमारीची पाळी येत आहे. या कठीण काळात गरजू लोकान मदत व्हावी या साठी दिख्खत यांनी पुढाकार घेऊन जिवनवाश्यक वस्तूचे किट तयार करून हे किट गरजू व्यक्तीची यादी काढून आशा कुटूंबाना या किट चे वितरण करण्यात आले. हे किटचे वितरण लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे यांचे स्मरणार्थ हे किट देण्यात आले. यावेळी माजी आ.केशवराव आधंळे, नगराध्यक्ष डाॕ स्वरूपसिंह हजारी, जेष्ठ पञकार अनिल महाजन, नागनाथ सोनटक्के, नगरसेवक रोहीत हजारी, शेख गफार, बालाजी चव्हाण, प्रतीष्ठीत व्यापारी लक्ष्मणनराव शेटे सामाजीक कार्यकर्ते उद्योजक उदयसिंह दिख्खत यांचे उपस्थीतीत हे किट चे वितरण सर्व नियमाचे पालन करत करण्यात आले.
यावेळी मंहेद्रसिंह दिख्खत, अजयसिंह दिख्खत, विजयसिंह दिख्खत, दिपक समर्थ, अशोक समर्थ, मोहन भोसले, संदीप पुजदेकर आदी यावेळी उपस्थीत होते.