आज जिल्ह्यात ३२ पॉझिटीव्ह; अंबाजोगाईत दोघांचा अंत्यविधी

बीडःदि.२७(प्रतिनिधी) आत्ताच आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आज ३२ ने वाढला आहे. आजही बीड शहरात सर्वाधिक पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. दरम्यान आज अंबाजोगाई येथील संत रोहिदास स्मशानभुमीत दोन पॉझिटीव्ह मृतांवर अंत्यविधी करण्यात आल्याची माहिती कळाली आहे. मात्र प्रशासनाकडून  अद्याप या बाबतीत अधिकृत माहिती जाहिर केलेलि नाही.

नऊ वाजुन पंधरा मिनिटाला आलेल्या अहवालानुसार बीड शहरात १६ तर परळी तालुक्यातील ११, गेवराईमध्ये ४ तर शिरुरमध्ये १ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. यात १८ जन पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित किंवा संपर्कातील तर १४ रुग्ण नवीन आहेत. आजच्या अहवालात २३ पुरुष तर ९ महिला संक्रमित आहेत. आज रोजच्या पेक्षा लवकर अहवाल आल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान आज महत्वाच्या घडामोडीत अंबाजोगाई येथील संत रोहिदास स्मशानभुमीत दोन पॉझिटीव्ह मृतांवर अंत्यविधी करण्यात आल्याची माहिती कळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!