महाराष्ट्रात जवाद चक्रीवादळाचा तडाखा; भारतीय हवामान विभागाचा इशारा.

मुंबई दि.4 डिसेंबर – बंगालच्या उपसागरात (Bay of Bengol) कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे त्याचं रुपांतर जवाद चक्रीवादळात (cyclone) होवून हे वादळ शनिवारी सकाळी आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं, असं भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) म्हटलं आहे. परिणामी महाराष्ट्रातल्या मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान विभागाचे वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.
(Cyclone Jawad hits Maharashtra; Warning of Indian Meteorological Department.)
जवाद चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून ओडिशातील 19 जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर, “ओडिआरएफ, एनडीआरएफ (NDRF) अशा 247 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तर 20 टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बहुतांश जिल्ह्यांमधील लोक घरातून बाहेर निघायला तयार नाहीयेत. मदतकार्य आजपासून सुरू केलं जाईल,” असं ओडिशाचे मदतकार्य विभागाचे आयुक्तांनी म्हटलं आहे.
आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारनं आतापर्यंत 3 जिल्ह्यांतील 54 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. एनडीआरफ आणि इतर टीम बचावकार्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 1 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.
रेड अलर्ट
भारतीय हवामान विभागानं गुरुवारी (2 डिसेंबर) जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशाच्या 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट (Red alert) घोषित केला होता. यासहित 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (orange alert) जारी करण्यात आला होता. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची (heavy rains) शक्यता आहे. 3 ते 5 डिसेंबरदरम्यान समुद्रात न जाण्याचा सल्ला मच्छिमारांना देण्यात आल्याचं हवामान विभागाच्या उमाशंकर दास यांनी म्हटलंय. एएनआय या वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
याचदरम्यान अरबी समुद्रातही (Arabian sea) कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. परिणामी महाराष्ट्रातल्या मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान विभागाचे वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.
जवाद चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात उत्तर भागात तयार झालेला कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या भागात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची (heavy rain) शक्यता भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केलीय.