एक जन निगेटिव्ह; १९ स्वॕब अहवालाची प्रतिक्षा.

किल्लेधारूर दि.२२(प्रतिनिधी) तालुक्यातील कुंडी येथील पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील व इतर असे २० स्वॕब नमुने तपासणीसाठी लातूर येथील स्व. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती. यापैकी बोडखा येथील उशिरा पाठवलेल्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला असून इतर १९ स्वॕब अहवाल रात्रीपर्यंत उपलब्ध होतील अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिलि.
दोन दिवसांपुर्वी आलेल्या अहवालात माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. याच अहवालात किल्लेधारुर तालुक्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह होता. मुळात या रुग्णाच्या इतर कुटूंबातील व्यक्तींचा पॉझिटीव्ह रुग्णात समावेश आहे. किल्लेधारुर तालुक्यातील कुंडी येथील एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटूंबियातील सहा सदस्य तसेच काल दि.२१ गुरुवारी याच कुटुंबातील स्वॕब घेतलेले आठ सदस्य व तेलगाव येथील दोघांचे व बोडखा येथील एक असे एकुण १७ व एका गुन्ह्यातील तीन आरोपीचे मिळून २० स्वॕब स्व. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती. यापैकी तालुक्यातील बोडखा येथील सर्दी, ताप,खोकल्याची लक्षण असणाऱ्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर उर्वरित स्वॕब अहवाल रात्री पर्यंत उपलब्ध होतील अशी माहिती डॉ. शेकडे यांनी दिली.