एस टी महामंडळाचे निवृत्त रोखपाल अंबादास गुन्नाल यांचे निधन

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर)किल्लेधारूर शहरातील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी निवृत्त रोखपाल अंबादास रामभाऊ गुंन्नाल (६२) यांचे दिर्घ आजारानं आज दि.१२ रोजी सकाळी दुःखद निधन झाले.

अंबादास रामभाऊ गुंन्नाल यांचे ६२ व्या वर्षी राहत्या घरी दिर्घ आजाराने आज दि.१२ मंगळवार  रोजी निधन झाले. कामात शिस्तबद्ध, सर्वांशी आपुलकी निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व असणारे गुन्नाल एस टी आगार किल्लेधारूर येथे वरिष्ठ रोखपाल म्हणून ३३ वर्ष कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर पोलिस ठाणे मागिल स्मशानभुमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!