हातपंप दुरूस्तीच्या गाडीसाठी चक्क सभापतीनी दिला उपोषणाचा इशारा….

किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर)- धारूर तालुक्यातील जनतेला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्षच करावा लागतो हे जग जाहीर आहे परंतू जनतेसाठी पदाधिकाऱ्यांनाही संघर्षच करावा लागत आहे हे दूर्दैवी आहे. पंचायत समिती धारूर (Dharur) ची हातपंप दुरूस्तीची गाडी किरकोळ दुरूस्ती, विमा भरणे, आर टी ओ फिटनेस, कर्मचारी नाहीत या कारणावरून गेल्या दहा महिन्यापासून जि.प. बीड येथे जमा केलेली गाडी परत येत नसल्याने चक्क सभापतीनी गाडीसाठी उपोषणाचा इशारा दिला आहे.

मागील सहा महिन्यापासून सभापती सौ.चंद्रकलाताई हनुमंत नागरगोजे या गट विकास अधिकारी धारूर (Dharur) यांच्या मार्फत मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.बीड व कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा बीड (Beed) यांच्याशी पत्र व्यवहार करीत आहेत. परंतू प्रशासन सुस्त जनता त्रस्त झाली आहे. विशेष म्हणजे या बाबत आ.प्रकाशदादा सोळंके यांनी ही पत्र व्यवहार केलेला आहे. परंतू हात पंप दुरूस्तीच्या गाडी येण्याला मुहुर्त लागत नाही. दिवसेंदिवस पाणी टंचाईला तोंड देणाऱ्या या तालुक्यात हातपंप दुरुस्तीची मागणी वाढली आहे. अवघ्या काही दिवसांवर उन्हाळा येवून ठेपलेला आहे. आजच तालुक्यांतील जनतेला पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. हातपंप आहेत पण नादुरूस्त, दुरूस्ती साठी गाडी, कर्मचारी नाहीत ते तात्काळ मिळावेत यासाठी सभापती सौ.चंद्रकलाताई हनुमंत नागरगोजे व उपसभापती प्रकाश कोकाटे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. जर दि.९ फेब्रुवारी पर्यंत हातपंप दुरूस्तीची गाडी व कर्मचारी पं.स.धारूर येथे मिळाले नाहीत तर दि.१० फेब्रुवारी पासून सभापती व उपसभापती पं.स.सदस्यांसह जि.प.बीड (Beed) समोर उपोषणास बसणार आहेत. या बाबत चे निवेदन सभापती पती हनुमंत नागरगोजे व राष्ट्रवादी ओबीसी सेल चे प्रदेश सरचिटणीस प्रा.ईश्वर मुंडे यांनी जि प बीड येथे जाऊन दि.२७ जानेवारी रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांना दिले आहे.

“हातपंप दुरूस्तीची गाडी व कर्मचारी मिळावेत या साठी आम्ही मागील सहा महीन्यांपासून प्रयत्नशील आहोत परंतू गाडी मिळाली नाही. हातपंप दुरूस्तीची मागणी वाढत आहे.जनतेच्या मागणीला न्याय भेटत नाही म्हणून जनतेसाठी सह कुठुंब उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.”
-हनुमंत नागरगोजे, जेष्ठ नेते रा.काँ.पा,धारूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!