तालुका क्रीडा संकुल समितीची आ.प्रकाशदादा सोळंके यांनी घेतली बैठक

किल्लेधारूर दि.१६(वार्ताहर) येथील तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक आज दि.१६ शुक्रवार रोजी तहसील कार्यालयात आ.प्रकाशदादा सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे, कर्मचाऱ्यांचे मानधन आदीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, तहसीलदार वंदना शिडोळकर उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून बैठक झाली नसल्याने क्रीडा संकुलातील विकास कामे रखडली होती. या बैठकीनंतर रखडलेली कामे सुरु होवून कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी कडून व्यक्त केली जात आहे. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, क्रीडा संयोजक लवकुमार गव्हाणे, क्रीडा प्रशिक्षक वर्षा कच्छवा, लालासाहेब तिडके, जयदत्त नरवडे, सुधीर शिनगारे, सय्यद शाकेर, शहराध्यक्ष नितिन शिनगारे, ज्ञानेश्वर होरमाळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!