होय… पुढच्या महिन्यातच येणार तिसरी लाट; एका दिवसात 4 ते 5 लाख कोरोना रुग्णांचा अंदाज.

नवी दिल्ली दि.23 अॉगस्ट – कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. आपल्याला कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. आपल्याला कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. पुढच्या महिन्यात तिसऱ्या लाटेत (Third wave) एका दिवसात 4 ते 5 लाख कोरोना रुग्ण येण्याचा अंदाज निती आयोगाचे सदस्य वी. के. पॉल यांनी व्यक्त केला आहे.
(Yes … the third wave will come next month; An estimated 4 to 5 million corona patients a day.)
देशावर ओढावलेली कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे देशभरातील अनेक राज्यात लागू असलेले निर्बंध (restrictions) शिथिल करण्यात येत आहेत. पण असे असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने आधीपासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीही सप्टेंबर 2020 मध्ये निती आयोगाने दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला होता. पण आता वर्तवलेला अंदाज अधिक जास्त असल्याचे दिसत आहे. गंभीर आणि मध्यम लक्षणे असलेल्या जवळपास 20 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल, असेही सांगितले असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिले आहे.
दुसऱ्या लाटेवेळी आधारित पॅटर्नवर हॉस्पिटल बेड बाजूला ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. कोरोना लसीकरण (vacccination) मोहीमेचा वेग वाढवण्यात आला असून आतापर्यंत सहा कोरोना प्रतिबंधक लसींना (Corona vaccine) परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन निती आयोगाचे सदस्य वी. के. पॉल यांनी गेल्या महिन्यात काही सूचना दिल्या आहेत. त्यात 100 पैकी 23 रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
आपल्याला कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. एका दिवसात 4 ते 5 लाख कोरोना रुग्ण येण्याचा अंदाज आहे. पुढच्या महिन्यात दोन लाख आयसीयू बेड (ICU Bed) तयार ठेवले पाहीजेत. यात व्हेंटिलेटरसह 1.2 लाख आयसीयू बेड, 7 लाख नॉन-आयसीयू हॉस्पिटल बेड (त्यापैकी 5 लाख ऑक्सिजन बेड) आणि 10 लाख कोविड आयसोलेशन बेड (Isolation bed) असावेत, अशा सूचना निती आयोगाने (Policy Commission) दिल्या आहेत.
दुसऱ्या लाटेवळी म्हणजेच 1 जूनला देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 लाख होती. तेव्हा 21.74 टक्के रुग्णांना 10 राज्यातील रुग्णालयात भरती करावे लागले होते. यापैकी 2.2 टक्के रुग्णांना आयसीयूत भरती करण्यात आले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर कोविड रुग्णालये आणि बेडच्या वापरावर आधारित हा सर्व अंदाज होता. पहिल्या लाटेदरम्यान 100 पैकी 20 जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 2.43 लोकांना आयसीयूची आवश्यकता भासली होती. 80 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते आणि त्यापैकी 55 जणांना कोरोना सेंटरमध्ये उपचार करण्यात आले होते. आता दुसऱ्या लाटेनंतर अंदाजात सुधारणा करण्यात आली आहे.